खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: 🔷 चालू घडामोडी :- 30 ऑगस्ट 2024

 

◆ महराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील दिघी येथे नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

 

◆ जगात दरडोई सर्वाधिक संपत्ती स्वित्झर्लंड या देशाकडे आहे.

 

◆ पंतप्रधान जनधन योजनेला 10 वर्षे पूर्ण झाली असून या योजेअंतर्गत आतापर्यंत देशभरात बँकांमध्ये 53.13 कोटी खाते उघडण्यात आले आहेत.

 

◆ केंद्रीय मंत्रीमंडळाने 234 शहरामध्ये खाजगी FM रेडिओ सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

 

◆ राष्ट्रीय क्रीडा दिवस 29 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो.

 

◆ देशांतील 10 राज्यांत 12 औद्योगिक स्मार्ट शहरे उभारण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे.

 

◆ केंद्र सरकारने कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची व्याप्ती एक लाख कोटी रुपयांनी वाढवली आहे.

 

◆ आशियाई चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धा चीन या देशात आयोजित करण्यात येणार आहे.

 

◆ आशियाई चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धा 8 ते 17 सप्टेंबर या कालावधीत चीन मध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

 

◆ भारतीय हॉकी संघाचा नवीन गोलरक्षक म्हणून क्रिशन पाठक यांची घोषणा करण्यात आली आहे.

 

◆ बी. श्रीनिवासन यांची नॅशनल सेक्युरीटी गार्ड NSG च्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

◆ इंग्लंड या देशाचा खेळाडू डेविड मलान ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे.

 

◆ राष्ट्रीय क्रीडा दिवस 2024 ची थीम “स्पोर्ट फॉर द प्रमोशन: शांततापूर्ण आणि समावेशी समाज” ही आहे.

 

◆ स्टेट बँकेने या दशकात उत्तम कामगिरी करून जागतिक क्रमवारीत 17वे स्थान प्राप्त केले आहे.

 

◆ स्टेट बँकेचे नवे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी बँकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✍️ माहिती संकलन :- खबरीलाल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button