खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

किसान काँग्रेसतर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आंदोलन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ किसान काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.

अमळनेर तालुक्यात गेल्या अडीच महिन्यांपासून सतत पावसाने खरीप हंगाम धोक्यात आल्याने हातातोंडातुन गेलेला आहे. त्यासाठी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलगर्जीपणामुळे कोसळला. ठेकेदार व संबंधित मंत्री यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना दिले आहे.या निवेदनानुसार अमळनेर तालुक्यात मागील अडीच महिन्यापासून होणा-या सतत पावसामुळे मुग, उडीद, मका, बाजरी, ज्वारी कापूस, सोयाबीन आदी अनेक प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असुन खरीप हंगाम २०२४ पुर्णपणे हातातोंडातुन गेलेला आहे. तसेच कापूस पिकांवर सर्वत्र मर रोगाचा पादुर्भाव झालेला आहे व शेतामध्ये सर्वदुर पाणी साचले आहे. त्यामुळे पिकांची मुळे पुर्णपणे अकार्यक्षम झालेले आहेत. यामुळे कापूस पिकाला धोका निर्माण झाला असून  खरीप हंगाम पुर्णपणे वाया गेलेला आहे तरी कोणत्याही पिकांचे केवळ १० टक्केही उत्पादन येणार नाही तरी लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावा. व केवळ ८ महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला यासाठी संबंधित खात्याचे मंत्री व संबंधित ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच तालुक्यात दुष्काळ जाहीर न केल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा किसान काँग्रेस सेलचे प्रा. सुभाष पाटील, सुरेश पाटील,  डॉ. अनिल शिंदे, धनगर पाटील, नीलकंठ पाटील, महेश पाटील, प्रवीण जैन, त्र्यंबक पाटील, दीपक शिसोडे, बन्सीलाल भागवत, प्रताप पाटील, मुन्ना शर्मा, सुनिल पाटील, कैलास पाटील यांच्यासह कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button