अमळनेर शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवांसाठी सोमवारी कार्यशाळा

राज्याचे सेवानिवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ करणार मार्गदर्शन

अमळनेर– शहर व तालुक्यातील पत्रकार बांधवाना पत्रकारांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना तसेच मराठी वाड्मय मंडळ संचालित प्रा.र.का केले सार्वजनिक वाचनालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यशाळेचे आयोजन सोमवार दि ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वा.नांदेडकर सभागृह,न्यू प्लॉट अमळनेर येथे करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेत महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जसनसंपर्क महासंचनालयातून माहिती संचालक या पदावरून सेवानिवृत्त झालेले देवेंद्र भुजबळ हे अनमोल मार्गदर्शन करून पत्रकार बांधवांच्या विविध शंकांचे निरसन करणार आहेत.तरी सर्व पत्रकार बांधवांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी सर्व पत्रकार बांधवांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपुत,उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सचिव चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. हि कार्यशाळा शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांसाठी खुली असणार आहे.
दरम्यान देवेंद्र भुजबळ हे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातून माहिती संचालक या पदावरून निवृत्त झाले आहेत. या महासंचालनालायत त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी,रायगड,उपसंचालक, कोकण ,नासिक ( विभाग ) उपसंचालक ( वृत्त विभाग)म्हणूनही काम पाहिले आहे. तत्पुर्वी त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रात जवळपास सहा वर्षे कार्यक्रम निर्मिती केली आहे.काही काळ ते पत्रकार देखील होते.आपलं दैनंदिन कामकाज संभाळुन श्री भुजबळ यांनी अनेक विषयांवर लेख लिहिलेले आहेत. विविध व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत.त्यांनी अनेक ठिकाणी अनेक विषयांवर व्याख्याने दिली आहेत आणि अजूनही देत असतात.पुणे विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड कम्युनिकेशन या पदवी अभ्यासक्रमात ते “प्रा. ल.ना. गोखले ” पाठयवृत्तीचे सर्वप्रथम मानकरी ठरले होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या अभ्यासक्रमात ते प्रथम श्रेणीत सर्वप्रथम येऊन काही पदकांचे मानकरी ठरले होते.एक उल्लेखनीय बाब म्हणजे आपल्या एवढ्या व्यस्त कामकाजात देखील त्यांनी आपली समाजकार्याची आवड जोपासली आहे.त्यांना अनेक राज्य, राष्ट्रीय पुरस्कारानी गौरविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *