खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

ताडेपुरा भिमनगर येथे घराबाहेर लावलेली पिकअप व्हॅन चोरी

अमळनेर (प्रतिनिधी) ताडेपुरा भिमनगर येथे घराबाहेर लावलेली ६५ हजार रुपयांचे पिकअप व्हॅन चोरट्याने चोरून नेल्याची घटना १८रोजी रात्री ते १९ रोजी सकाळच्या दरम्यान  घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 राज रावण संदानशीव (रा. भीमनगर ताडेपुरा) याने व्यवसायात मंदी असल्याने  त्याची पिकअप व्हॅन (क्रमांक एम एच १९ सी वाय ९२२७) ही दहा पंधरा दिवसांपासून घरासमोर लावून ठेवलेली होती. १८ रोजी रात्री १० वाजता गाडी घराबाहेरच लावलेली होती. मात्र १९ रोजी सकाळी गाडी जागेवर नव्हती. गाडी चोरीस गेल्याची खात्री झाल्यावर त्याने फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button