अमळनेर (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेनेच्या राज्य संघटकपदी ॲड. ललिता श्याम पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेले भरीव काम त्यांच्यातील कार्यकर्ते संघटन कौशल्य तसेच नुकत्याच अमळनेर येथे झालेला शिवसेनेचा मेळावा त्यांनी यशस्वी केला. या मेळाव्याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असताना त्यांची राज्य संघटक पदी झालेली नियुक्ती ही त्यांच्या कार्याची पावती मानली जात आहे. या थोड्याच अल्पावधीत त्यांच्या निवडीने अंमळनेर तालुका व शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाब वाघ, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, डॉ. हर्षल माने, महानंदाताई पाटील, युवासेना सचिव विराज कवाडिया, जिल्हा युवासेना प्रमुख निलेश चौधरी यांच्यासह अमळनेर शहरातील शिवसेना पदाधिकारी व अनेक मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.