आ.स्मिता वाघ यांच्या हस्ते शुभारंभ,पांझरा परिसर होणार टंचाईमुक्त
अमळनेर(प्रतिनिधी)पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पांझरा नदीला पूर येऊनही पुराचे पाणी वाया जात असल्याने पांझरा नदी काठावरील गांवाना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असते यावर तोडगा काढण्यासाठी आ स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांनी पांझरा नदीतील पाण्याचे पुनर्भरण करण्यात येत असून याचा शुभारंभ आ सौ वाघ यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर उपक्रमाने या संपूर्ण परिसराला कायमस्वरूपी टंचाई मुक्त करणे शक्य होणार असल्याची बाब आ सौ वाघ यांनी लक्षात घेवून पारंपरिक फड पद्धतिचे पुनर्जीवन व भाल्या नाल्याचे खोलिकरण करण्याची संकल्पना मांडली.व यानुसार आ वाघ यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून जोमाने प्रयत्न करून या कामाचा समावेश जलयुक्त शिवार अंतर्गत करून निधी देखील मंजूर करून घेतला.सदर कामांतर्गत पांझरा नदीचे पाणी मांडळ फळ बंधाऱ्याच्या कालव्याद्वारे भाल्या नाल्यात टाकुन पुनर्भरण करण्यात येणार असून सोबत मांडळ फळ कालव्या वरील जुन्या काळी होत असलेल्या सिंचनाची नव्याने पुनर्स्थापना करण्यात येणार आहे,तसेच मांडळ फळ बांधऱ्याची दुरुस्ती धुळे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे, या कामासाठी मा.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, निवृत्त अधिक्षक अभियंता जलतज्ञ .व्ही.डी. पाटील यांच्या मार्गदर्शन वेळोवेळी होत आहे सदर काम कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारा विभाग धुळे यांच्या सहकार्याने व कार्यकारी अभियंता श्री.नागेश एम वट्टे,शाखा अभियंता श्री विवेक महाले यांच्या देखरेखीखाली होणार आहे.
या कामाच्या शुभारंभ प्रसंगी,पं. स.सभापती वजाबाई भिल,.पावभा पाटील,जि.प.सदस्या संगीताताई भिल,मा.पं.स.सभापती डॉ.दीपक पाटील,चंद्रसेन सुर्यवंशी, किसनराव पाटील,मा.जि.प.सदस्य संदीप पाटील,मांडळ सरपंच मनोहर पाटील,हेकलवादी सरपंच भास्कर पाटील,मुडी सरपंच काशिनाथ माळी, जवखेडा सरपंच राजेंद्र पाटील,मा.सरपंच नथु पाटील,अशोक कोळी,अनिल जैन,विजय पाटील,गणेश कोळी रातीलाल पाटील,मांडळ पोलीस पाटील,भास्कर पाटील,संजय पाटील,हेमंत पाटील उपस्थित होते.