अमळनेर- नोव्हेम्बर 2018 या महिन्यात घेण्यात आलेल्या सी ए (चार्टर्ड अकाऊंटंट) परीक्षेचा निकाल दि 23 जानेवारी रोजी घोषित करण्यात आला,त्यात अमळनेर येथील श्रीपाल सुरेश झाबक याने 800 पैकी 445 गुण मिळवून सी ए च्या दोन्ही ग्रुप मध्ये उल्लेखनीय यश मिळवुन उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला.
श्रीपाल ने पुणे शाखेमधून हे यश मिळविले आहे.अमळनेर येथील प्रसिद्ध सुरेश एजन्सी चे मालक सुरेश झाबक यांचा तो सुपुत्र असून शिक्षणानंतर अमळनेर येथेच स्थायिक होऊन मातृभूमीत सेवा देण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.