अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, रुसा यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योग विभागाच्या प्रा.डॉ.लिना मनिष चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना शाश्त्रशुद्ध आणि मौलिक स्वरूपाचे मार्गदर्शन केले. यावेळी तारुण्यातले अर्थात युवा अवस्थेतील प्रश्नांची उत्तरे त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.
या समारंभासाठी विद्यापीठाचे योग विभाग प्रमुख डॉ. राजेश इच्छाराम पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण बी. जैन, उप-प्राचार्य डॉ. कल्पना पाटील, डॉ. योगेश तोरवणे यांच्यासह जिमखाना विभागाचे समन्वयक तथा सिनेट सदस्य प्रा.डॉ.संदीप नेरकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. मुकेश भोळे, प्रा. वृषाली वाकडे, डॉ. एस. डी. बागुल, डॉ.एस. एम .राजपूत, डॉ. संतोष दिपके, डॉ. हेमंत पवार, डॉ. प्रियंका पाटील, प्रा.अर्चना पाटील, प्रशांत भाऊ देवकाते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. प्रियांका पाटील यांनी केले तर अतिथींचा परिचय डॉ.एस एम राजपूत यांनी करून दिला. प्रास्ताविक वरिष्ठ जिमखाना विभागाचे समन्वयक प्रा.डॉ.संदीप नेरकर यांनी केले. आभार क्रीडा संचालक डॉ. सचिन पाटील यांनी
मानले.