अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंतुर्ली रंजाणे वि.का.स.सोसायटीच्या चेअरमनपदी शिवाजी दाजभाऊ पाटील यांची तर व्हॉईस चेअरमन पदी विमलताई पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे.
चेअरमन पदासाठी शिवाजी पाटील यांचे नाव संस्थेचे संचालक सचिन पाटील यांनी सुचवले, तर छोटू नीलकंठ पाटील यांनी अनुमोदन दिले तसेच व्हॉईस चेअरमन पदासाठी विमलताई रामदास पाटील यांचे नाव आबा वाल्मीक पाटील यांनी सुचवले तर सुभाष वामन सोनवणे यांनी अनुमोदन दिले. ही निवडणूक सब रजिस्टर ऑफिसचे एस.पी.महाजन यांच्या अध्यक्षतेत पर पडली. संस्थेचे सचिव कृष्णकांत भावसार यांनी निवडणूक कामत सहकार्य केले. सभेस सचिन पाटील, छोटू पाटील, सुभाष सोनवणे, देवदास पवार, विमल पाटील, मालती ताई पाटील, किशोर पाटील, आबा पाटील ,भास्कर सोनवणे, नारायण पाटील उपस्थित होते. निवडी बद्दल मंत्री अनिल पाटील, जयश्री पाटील, भागवत पाटील, अनिल शिसोदे, एल. टी.नाना, हिरालाल पाटील, राहुल पाटील, सुरेश तात्या, भोजमल पाटील यांनी देखील स्वागत केले.