अमळनेर (प्रतिनिधी) मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशासाठी विना विलंब शुल्क प्रवेशाची अंतिम मुदत दि. ३१ ऑगस्टपर्यंत असून प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत प्रताप महाविद्यालय अमळनेर (5321A) बी.ए./बी.कॉम/एम. ए.(मराठी/हिंदी/इतिहास) तसेच एम.बी.ए./ एमसीजे – पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम/बी. लीब/ डिप्लोमा इन स्टॅटिस्टिक्स अभ्यासक्रमात ऑनलाइन प्रवेश २०२४-२५ साठी विद्यार्थ्यांच्या मुक्त व दुरुस्त प्रशाळे अंतर्गत- खानदेश शिक्षण मंडळ अमळनेर, संचलित प्रताप महाविद्यालय अमळनेर (5321A) अभ्यासकेंद्रावर सुरू आहेत, तरी इच्छुक व्यक्तींनी, विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयात संपर्क करावा व आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करावे व या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रप्रमुख /प्राचार्य व केंद्र संयोजक यांनी केले आहे प्रवेशासाठी संपर्क क्रमांक 9322064181 या संपर्क क्रमांक वर संपर्क साधावा. कार्यालयीन वेळ सोमवार ते शनिवार दुपारी १२ ते ४.३० व रविवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.