अमळनेर (प्रतिनिधी) येथील नेहरू समाज कार्य महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिक दिवस आणि सद्भावना दिवस यानिमित्ताने मान्यवारांची व्याख्याने झाली.
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त येथील बन्सीलाल भागवत गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि सद्भावना दिवस निमित्ताने नवल नगरचे प्रा. डॉ. के. डी. बागुल यांनी प्रबोधनपर व्याख्यान दिले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष विभाग प्रमुख प्रा. डॉ. जगदीश सोनवणे, डॉ. अस्मिता सरवैय्या, आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रतन बेंडकुळी यांनी तर आभार सुहास कोकणी यांनी मानले.