खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

खापरखेडा व रुंधाटी शेत शिवारातून १५ हजाराच्या २७०० मीटर तारा चोरी

अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील खापरखेडा व रुंधाटी शेत शिवारातून चोरट्यानी सुमारे १५ हजार किमतीच्या २७०० मीटर तारा चोरून नेल्याची घटना ७ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सहाययक अभियंता प्रदीपकुमार दिनेश परदेशी  याना  ७ ऑगस्ट रोजी पातोंडा शिवारातील वायरमन संभाजी पाटील यांनी कळविले की रुंधाटी शिवारातील हिरालाल यांच्या शेतातील डीपीवरून तीन गाळ्यातल्या १८ मीटर विद्युत तारा चोरीस गेल्या आहेत. तर खापरखेडा येथील वायरमन विजय पाटील यानेही कळवले की भीमा दादा यांच्या शेतातील ९०० मीटर लांबीच्या ५ हजार रुपयांच्या विद्युत तारा चोरीस गेल्या आहेत. अभियंत्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विजया  भोई करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button