खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

वरिष्ठांनी दखल घेतल्याने अमळनेरातील राजकीय भूकंपाचे झटके झाले सौम्य

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर मतदार संघातून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून सुरू झालेल्या कुरघोडी राजकारणाची खबरीलालने ब्रेकिंग केल्याने या भूकंपाला सौंम्य करण्यास वरिष्ठ नेत्याना यश आले आहे. त्यामुळे मोठा राजकीय भूकंप होण्यापासून वाचला आहे. आज शहरात येणाऱ्या सुप्रिया सुळे यांना पक्षाचेच पदाधिकारी बॅनर कटाऊट दाखवून निदर्शन करणार असल्याने खळबळ उडणार होती. त्यामुळे प्रमाणिकपणे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याशी  पॅचप करण्यात यश आले आहे.

 

साहेबराव दादा राहणार अनुपस्थित

 

मंत्री अनिल पाटील यांनी साहेबराव दादा आम्ही सर्व एकत्र असल्याचे भासवले होते.उपमुख्यमंत्री अजित दादा हे त्यांच्या घरी आल्यावर ते अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे ते मंत्री अनिल पाटील सोबत नाही तर शरद पवार गटाकडे जातील, अशी चर्चा होती. तर आज सुप्रिया सुळे येत असल्याने आणि अंतर्गत बंडा‌ळी चव्हाट्यावर आल्याने साहेबराव दादा सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यातही अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते नंतर काय भुमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button