अमळनेर (प्रतिनिधी) स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात १४ रोजी रोत्री मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे मशाल रॅली काढण्यात आली. यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘भारत माता की, जय…’, ‘वंदे मातरम्…’ आदी घोषणांनी सेवेकरांनी परिसर दणाणून गेला होता.
रात्री १० वाजता मंगळ ग्रह मंदिरापासून ते सुभाष चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, प्रकाश मेखा, व्ही. व्ही. कुलकर्णी, सेवेकरी आर. टी. पाटील, पुषंद ढाके, राहुल पाटील, शरद कुलकर्णी आदींनी हातात तिरंगा ध्वज व पेटती मशाल घेतल्या होत्या. देशभक्तीपर गितांमुळे परिसर चैतन्यमय झाला होता. रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पू. सानेगुरूजी, सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले .रात्री ठिक १२ वाजता ध्वजारोहण होऊन राष्ट्रगिताने रॅलीची सांगता झाली.