खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

प्रताप महाविद्यालयात सेट परीक्षा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पात्रता सेट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात रसायनशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी विवेक पाटील (सेट रसायनशास्त्र) व सागर संजय सैंदाणे हा साहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेत मराठी विषयातून पात्र झाल्याबद्दल रसायनशास्त्र विभागातील समस्त प्राध्यापकांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सत्कार वेळी सागर सैंदाणे यांनी खरा शिक्षक तोच जो विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करतो अशी आदर्श शिक्षकाची व्याख्या विद्यार्थ्यांसमोर मांडत सर्व गुरुजनांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button