खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

चोरी, घरफोडी, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे : सपोनि जिभाऊ पाटील

डीवायएसपी राकेश जाधव यांची संकल्पना फेल, अशोक पाटील आता देताय चालना

 

अमळनेर (प्रतिनिधी) सध्यस्थितीत चोरी, घरफोडी, भांडण, तंटे, दंगल आदी गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची महत्त्वाची भूमिका असून सभापती अशोक आधार पाटलांच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे ही संकल्पना आता ग्रामीण भागातही रुजू होत आहे, हे खरच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन मारवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील यांनी केले. दरम्यान, तत्कालीन डीवायएसपी राकेश जाधव यांनी संकल्पना रुजवील असली तरी ती फेल गेली आहे.

तालुक्यातील वावडे येथील अभ्यासिकेत आयोजित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, पोलीस उपनिरीक्षक मंगला पवार, सहा. पोलीस उपनिरीक्षक फिरोज बागवान, पोलीस पाटील डॉ. दत्ता ठाकरे, डॉ. चेतन पाटील, धनराज पाटील, संचालक भाईदास भिल आदी उपस्थित होते.  ते पुढे म्हणाले की, आपण जरी झोपून घेतले तरी तिसरा डोळा म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे काम करत असतात. कॅमेरे बसविल्यानंतर सुमारे ७० ते ८० टक्के गुन्हेगारी कमी होण्यास मदत होते, असेही ते म्हणाले. उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, आजची तरुणाई ही देशाचे भवितव्य आहे. या तरुणाईला योग्य वेळी मार्गदर्शन मिळाल्यास ते अशक्य ते शक्य करु शकतात. मात्र सध्या  बहुतांश तरुण अभ्यास सोडून प्रेमप्रकरणात व इतर गोष्टींमध्ये अडकलेले दिसून येत आहेत. ही खेदाची बाब आहे. स्वप्न मोठे बघा, थोड्यावर थांबू नका. या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, म्हणून यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहा, असेही ते म्हणाले. यावेळी अभ्यासिकेच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. प्रास्तविक अशोक पाटील यांनी तर सूत्रसंचालन डॉ. दत्ता ठाकरे यांनी केले.

दरम्यान, तत्कालीन डीवायएसपी राकेश जाधव यांनी संकल्पना रुजवील असली तरी ती फेल गेली आहे. अनेक गावात कॅमेरे कुठे तर डिव्हीआर कुठे अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठा गजाबाजा केलेली ही संकल्पना आता धुळीस मिळाली आहे. तिला उभारणी देण्याचे काम आता सभापती अशोक पाटील यांनी चालना दिली आहे.

 

आणखी  १० ते १२ गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

 

डीवायएसपी राकेश जाधव यांच्या संकल्पनेनुसार राबविलेली सीसीटीव्ही कॅमेरेची योजना फेल गेल्यानंतर आता  सभापती अशोक पाटील यांनी नुकतेच वावडे या गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी ७० टक्के रक्कम अशोक पाटील व ३० टक्के रक्कम लोकवर्गणीतून गोळा केली जाणार आहे. या अगोदरही त्यांनी गलवाडे खु., गलवाडे बु., झाडी, भरवस या गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून आगामी काळात मुडी-मांडळ परिसरातील १० ते १२ गावांमध्ये अशोक पाटील कॅमेरे बसवून देणार आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button