आयएमए च्या अध्यक्षपदी डॉ.नितीन पाटील यांची निवड सेक्रेटरीपदी डॉ.निखिल बहुगुणे तर खजिनदार डॉ.संदीप जोशी

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अमळनेर शाखेची बैठक दि २५ जानेवारी रोजी संपन्न होऊन या बैठकीत अध्यक्षपदी बालरोग तज्ञ डॉ.नितीन शिवाजीराव पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली,तर सेक्रेटरी पदी डॉ. निखिल बहुगुणे व खजिनदार पदी डॉ.संदीप जोशी यांची निवड करण्यात आली.
आयएमए चे मावळते अध्यक्ष डॉ राहुल मुठे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने यापूर्वी सेक्रेटरी असलेले डॉ. नितीन पाटील यांना अध्यक्ष पदाची संधी देण्यात आली. निवडीनंतर नूतन अध्यक्ष डॉ.पाटील यांनी आयएमए मार्फत शहर व ग्रामिण भागात जंनसेवेसाठी आरोग्य शिबिरे घेण्याचा मानस व्यक्त केला,तसेच महिला सक्षमीकरणासाठी आयएमए महिला विंग स्थापन करण्याचेही त्यांनी जाहीर केले. यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला. याप्रसंगी आयएमए चे वरिष्ठ सदस्य डॉ.बी.आर. बाविस्कर, डॉ.अनिल शिंदे,डॉ.अविनाश जोशी,डॉ.बी.ओ पाटील,डॉ.नरेंद्र सोनवणे,डॉ.दिलीप गुजराथी,डॉ.अक्षय कुळकर्णी,डॉ.राहुल मुठे,डॉ.सचिन भावे,डॉ .निल हजारे, डॉ.सचिंद्र्र हजारे,डॉ.दिनेश पाटील,डॉ.सुमित सूर्यवंशी,यासह सर्व आयएमए सदस्य तसेच महिला सदस्या उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *