

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे नुकत्याच जन्मलेल्या पूर्ण वाढ झालेले नाळेसह जिवंत (अर्भक) चिमुकलीला एका मातेने अनाकलनीय कृत्य करून संडासाच्या टाकीत फेकून एक निर्दयी माता पळून गेल्याची घटना प्रजासत्ताक दिनी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने सर्वांनाच सुन्न करून सोडले आहे. बुरसटलेल्या विचारांनी ग्रासलेल्या जन्मदात्यांनी अखेर एक कळी खुडण्याचा डाव रचला.अन अवघ्या काही तासाच चिमुकलीला कुंड्यात फेकण्यात आले.
माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना अमळनेर तालुक्यातील दहीवद गावी मुलगी झाली म्हणून एका जन्मदात्रीनंच नवजात मुलीला शौचालयाच्या कुंड्यात फेकून जिवंत ठार मारण्याचा प्रयत्न केला.
मातृहृदय एवढे कठोर का झाले हे समजायला मार्ग नाही.
पोटच्या गोळ्याचा बळी घेण्याचे बळ आईमध्ये आले तरी कुठून असेल..? मुलीचं दैव बलवत्तर म्हणून शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळं मुलीचा जीव वाचवण्यात यश आलं होत.
२६ रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास रेखाबाई वडार या महिलेला शौचालयाच्या टाकीजवळ एक लहान अर्भक रडत असल्याचा आवाज आला तिने आपल्या पतीच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते पन्नलाल मावळे यांना सांगितले त्यांनी पोलिसांना व १०८ रुग्णवाहिकेला बोलावले तोपर्यंत दमोता बाई सोनवणे या महिलेने बाळाला स्वछ करून त्याला शाल पांघरून उबदार केले व मायेचीउब दिली. आणि पोलिसांनी पंचनामा करून अर्भक ताब्यात घेतले. वैद्यकीय पथकास बोलावून डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून बाळाला धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध भादवी ३१७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला तपास पी.एस.आय. चंद्रकांत चातुरे हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील हे करीत आहेत.
या दरम्यान काल २७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता उपचार घेताना त्या चिमुकलीचा जीव गेला अन डॉक्टरांनी मृत घोषित केले.