


अमळनेर : तालुक्यात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला पोलीस कवायत मैदानावर शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून स्वच्छता अभियान , देधभक्ती , पर्यावरण संवर्धन , बेटी बचाव , पाणी आडवा पाणी जिरवा आदी विषयी जनजागृती केली
पोलीस कवायत मैदानावर महसूल चे उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी आमदार शिरीष चौधरी , माजी आमदार साहेबराव पाटील , नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख , तहसीलदार प्रदीप पाटील , पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील , नायब तहसीलदार कमलाकार जोशी , ढोले , ऍड तिलोत्तमा पाटील , प्रवीण पाठक , अनिल महाजन , सुनील भामरे , विक्रांत पाटील , न पा प्रशासन अधिकारी संजय चौधरी हजर होते यावेळी शहरातील बहुतेक शाळांनी “अमळनेर आहे आमची शान , अमळनेर कर असल्याचा अभिमान ” या गीतावर नृत्य सादर केले सुत्रसंचांलन व आभार संजय पाटील यांनी मानले कार्यक्रमात के डी गायकवाड , सानेगुरुजी , न पा माध्यमिक , शिवाजी हायस्कूल , पर्ल इंग्लिश मेडिअम स्कूल , र सा पाटील प्राथमिक , नवीन मराठी शाळा, जि एस हायस्कूल , पी बी ए इंग्लिश मेडिअम स्कूल आदी शाळांनी सहभाग घेतला होता प्रताप महाविद्यालय आणि सानेगुरुजी नूतन विद्यालय यांनी मतदान जागृती वर पथनाट्य तर सानेगुरुजी कन्याशाळेने पर्यावरण संवर्धन यावर पथनाट्य सादर केले सर्व शाळांना प्रमुख अतिथींच्या हस्ते ट्रॉफी , प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
मंगरूळ
दादासो अंबर राजाराम पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ग स बँकेचे चेअरमन झाम्बर राजाराम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी श्रीकांत पाटील , प्रकाश पाटील , अशोक सूर्यवंशी , प्रभूदास पाटील , संजय पाटील ,राजेंद्र पाटील , शशिकांत पाटील , सुषमा सोनवणे , सीमा मोरे , शीतल चव्हाण , राहुल पाटील ,प्रवीण पाटील मनोज पाटील , प्रदीप पाटील , सुदर्शन पवार , वस्ती शाळेचे भटू पाटील हजर होते.
ग्रामपंचायत
ग्रामपंचायतीत सरपंच हर्षदा संदीप पाटील यांच्या हस्ते तर विविध कार्यकारी सोसायटीत व्ही टी पाटील व्हॉइस चेअरमन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मंगरूळ गावातील लोकनियुक्त सरपंच सौ हर्षदा संदीप पाटील यांनी त्यांच्या स्व खर्चाने मंगरूळ जिल्हा परिषद शाळा डिजिटल व्हावी या हेतूने एक प्रोजेक्टर भेट स्वरूपात देण्यात आले. त्या प्रसंगी ग्रामपंचायत चे उपसरपंच संजय पाटील , हिम्मत पाटील , पोलीस पाटील भागवत पाटील , भाईदास नवल पाटील , संदीप पाटील , अमोल पाटील , विठ्ठल पाटील,ग्राम पंचायत सदस्य गावातील जेष्ठ नागरिक ,तसेच हरित सेना चे सर्व सदस्य व सर्व तरुण बांधव उपस्थित होते.
प्राथमिक शाळा
मंगरूळ जि प प्राथमिक शाळेत माजी सैनिक प्रशांत पाटील यांनी ध्वजारोहण केले यावेळी मुख्याध्यापिका आशा भदाणे , शशिकांत गोसावी , सदाशीव पवार हजर होते यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर केलेत.
अमळनेर नगरपरिषद
लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर , प्रशासन अधिकारी संजय चौधरी , मनोज पाटील , सलीम फत्तु शेख , महेश पाटील यासह न पा चे इतर कर्मचारी हजर होते.
लोंढवे
आबासो एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयात उपसरपंच मिनाबाई पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर ग्रामपंचायतीत सरपंच कैलास खैरनार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी मुख्याध्यापक तथा भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जीवन पाटील , चित्राबाई पाटील , मच्छिन्नद्र पाटील ,सीमा पाटील ग्रामपंचायत सदस्य लोंढवे ग्रामस्थ व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते