
अमळनेर(प्रतिनिधी)-नोव्हेंबर २०१८ या महिन्यात घेण्यात आलेल्या सी ए (चार्टर्ड अकाऊंटंट) परीक्षेचा निकाल दि २३ जानेवारी रोजी घोषित करण्यात आला, त्यात अमळनेर येथील कु अक्षिता धनराज कोचर हिने ८०० पैकी ४९१ गुण मिळवून सी.ए.च्या दोन्ही ग्रुप मध्ये उल्लेखनीय यश मिळविले विशेष म्हणजे पुणे शाखेमधून दुसऱ्या रँक मध्ये तीने मिळविली आहे.
अमळनेर येथील होलसेल कापडाचे व्यापारी धनराज समीरमल कोचर यांची ती कन्या आहे,तर पुनम कोचर व खानदेश शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष कमल कोचर यांची ती पुतणी आहे.तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.तर पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.