
अमळनेर(प्रतिनिधी)येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत प्रजासत्ताक दिनी मुख्याध्यापक रणजित शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले तर गुणवंतांना गौरविण्यात आले.
सरस्वती विद्या मंदिर शाळेत प्रजासत्ताक दिवसानिमित्त विद्यार्थी विद्यार्थिनींनी ध्वजगीत, राष्ट्रभक्ती गीत,समूह गीत सादर केलीत.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विशाल शशांक जोशी यांच्या हस्ते भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षेत तालुकास्तरावर द्वितीय ,उतेजनार्थ पारितोषिक मिळविलेल्या तसेच सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.तर विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले. यावेळी शिक्षक आनंदा पाटिल, सौ.संगिता पाटिल, सौ.गीतांजली पाटिल, परशुराम गांगुर्डे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेष महाळपूरकर यांनी केले तर आभारप्रदर्शन धर्मा धनगर यांनी केले.