खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अखेर अमळनेरातच तालुक्यातील कामगारांना सुरक्षा साधनांसह, गृहोपयोगी वस्तू संच वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत कामगार लाभार्थ्यांना  तालुक्यातच साहित्य वाटपाचे नियोजन सहाय्यक कामगार आयुक्त व जिल्हा साहित्य पुरवठादार यांनी केले आहे.

बांधकाम क्षेत्रातील कामगार स्वतःच्या घरापासून दूर काम करण्यासाठी जातात. त्या कामगारांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत सुरक्षा साधनांसह, गृहोपयोगी वस्तू संच (किचन सेट)  साहित्य देखील वाटप करण्यात येते. मात्र या कामगार कल्याणकारी मंडळाचे जिल्हा स्तरावरून गृपयोगी वस्तू संच वितरित करण्याचे नियोजन ढासळले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर वाटप करण्यासाठी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठादार यांनी अमळनेर तालुक्यातील कामगारांना साहित्य घेण्यासाठी भडगाव येथे देण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे तालुक्यातील कामगारांना रोज बुडवत साहित्य घेण्यासाठी भाडे खर्च करून भडगाव जावे लागत होते. सुरक्षा साधनांसह, गृहोपयोगी वस्तू संच (किचन सेट) चे वितरण जिल्ह्यात सुरू आहे. मात्र अमळनेर येथील कामगारांना रोज बुडवत साहित्य घेण्यासाठी भडगाव गाठावे लागत होते. ही बाब असंख्य नागरिकांनी तक्रारी केल्याने त्याची त्वरित दखल घेत सहाय्यक कामगार आयुक्त व जिल्हा पुरवठादार यांनी तालुक्यातील मंगरूळ येथील शिरूड रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीत कामगारांना साहित्य वाटपाचे नियोजन केलेले आहे.

 

रोज न बुडता नियोजन चांगले

 

कामाचे दिवस असताना देखील आमच्या सोबतच्या काही कामगारांना मागच्या महिन्यात साहित्य घेण्यासाठी भडगाव येथे जावे लागले होते. पण आम्हाला आता इथेच रोज न बुडता नियोजन चांगले असल्यामुळे लवकर साहित्य मिळाले.

मयुरी नरेंद्र चौधरी, लाभार्थी

 

रोज दीडशे ते दोनशे कामगार साहित्य वाटप

 

अमळनेर येथील वाटप केंद्रातून रोज दीडशे ते दोनशे कामगार स्वतः येऊन सुरक्षा साधनासह, गृहोपयोगी वस्तू संच (किचन सेट) घेऊन जात आहेत. लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने आम्ही साहित्य वाटपाचे नियोजन उत्तमरीत्या केलेले असून कामगारांनी देखील सहकार्य करावे.

विवेक शिरसाठ, प्रतिनिधी जिल्हा साहित्य पुरवठादार

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button