अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री “गिरीश महाजन आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे उद्घाटन व भूमिपूजन सोहळा सोमवार दि 5 रोजी पार पडणार आहे.
प्रताप महाविद्यालयात सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी मध्यवर्ती ग्रंथालयाचे भूमिपूजन,नवीन सुसज्ज संगणक शास्त्र प्रयोग शाळेचे उद्घाटन, आणि नवीन सुसज्ज डिजिटल स्टुडिओचे उदघाटन मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी खासदार स्मिताताई वाघ, जळगाव विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनवणे, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, साहेबराव पाटील व शिरीष चौधरी यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन खाशी मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल व संचालक मंडळाने केले आहे.