खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मंत्री अनिल पाटील यांनी पद्मश्री महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारींची घेतली सदिच्छा भेट

रेवदंडा येथे सपत्नीक जात घेतले आशिर्वाद

 

अमळनेर (प्रतिनिधी) पद्मश्री महाराष्ट्रभूषण अप्पासाहेब धर्माधिकारी व त्यांचे सुपूत्र सचिनदादा धर्माधिकारी यांची रेवदंडा येथील निवासस्थानी मंत्री अनिल पाटील यांनी सपत्नीक सदिच्छा भेट घेत आशिर्वाद घेतले.

डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मनाव दत्तात्रेय नारायण असून ते महाराष्ट्रातील भारतीय समाजसेवक आहेत. नाना धर्माधिकारींच्या पावलावर पाऊल टाकत, अप्पासाहेब अध्यात्मिक कार्य करीत असताना यासोबतच महाराष्ट्रात अनेक वृक्षारोपन, रक्तदान शिबीर, निशुल्क वैद्यकीय शिबीर, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती केंद्र इत्यादी कार्यक्रमांच्या आयोजनास ते कारणीभूत ठरले आहेत. २०१४ मध्ये डाॅ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नेरुळने त्यांना विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित केले आहे. तसेच २०१७ मध्ये ते चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान, पद्मश्रीने सन्मानित झाले आहेत. खान्देशसह अमळनेर तालुक्यात देखील आप्पासाहेब यांचा अतिशय मोठा सेवक परिवार असून अमळनेर येथे नियमित त्यांच्या बैठका होत असतात,मंत्री अनिल पाटील हे या संपूर्ण सेवाभावी परिवाराशी श्रद्धेने जुळले असून अनेक उपक्रमात ते व त्यांचा परिवार सहभागी होत असतो. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सदिच्छा भेटीच्या निमित्ताने ते त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्यासह रेवदंडा येथे गेले होते. तेथे त्यांच्या निवासस्थानी आशीर्वाद घेतल्यानंतर बराच वेळ त्यांच्याशी सामाजिक कार्याबाबत हितगुज देखील केले.आप्पासाहेब व त्यांच्या परिवाराच्या सामाजिक कार्यात योगदान देण्याची ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button