खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

बेगानी शादी मे अब्दुला दिवाना, मी अपक्ष म्हणून लढणार

माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मांडली भूमिका

 

अमळनेर (प्रतिनिधी) राज्यात मुख्य युती भाजप सेना यांची आहे. परंतु यांची युती बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना अशी आहे, अशी टीका माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केली.

अमळनेर विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. मंत्री अनिल पाटील आणि माजी आमदार साहेबराव दादा यांची दिलजमाई झाल्याने एकमेव माजी आमदार शिरीष चौधरी विरोधक उरले आहेत. त्यामुळे उमेदवारीचे काय नाट्य रंगते हे येणाऱ्या काळात दिसेल. पण शिरीष चौधरी निवडणूक लढतील हे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. ते म्हणाले शिरीष चौधरी उभे राहतात की नाही अशी चर्चा होती. अनेक दिवसांपासून राजकारणात वेगवेगळ्या चर्चा होत्या, राजकीय नेते पोळ्या भाजण्यासाठी अफवा पसरवत होते. अमळनेर मतदार संघ काही नेत्यांच्या बोटावर नाचणारा असे दर्शविले जाते  ही मतदार संघात आलेली मग्रुरी थांबली पाहिजे. काही मोठे नेते अपघाताने निवडून आले, तो अपघातच होता. त्यांचे कार्यकर्ते अफवा पसरवत आहेत की शिरीष चौधरी आमदारकी लढवणार नाहीत. त्यांचे त्यांचे तर्क लावत आहेत. संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहेत. कोणीही एक व्यक्ती ठरवू शकत नाही. मी अपक्ष लढणार आहेच, मेळावा घेतला, पाच वर्षांपासून संपर्कात आहे. आताही माझे कामे सुरू आहेत. लोकांची दिशाभूल करून खोटा अपप्रचार करून की शिरीष चौधरी निवडले तर गुंडगिरी वाढेल, दादागिरी वाढेल. सोशल मिडियाबर बोर्ड लागले की गुंडगिरी थांबवा. त्यामुळे गुंडगिरी थांबवा, पण ज्यांनी दादागिरी केली त्यांचे फोटो नेत्यांबरोबर लागले.

 

दोन नेते स्वार्थासाठी एकत्र आले

 

शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. न्याय मिळाला नाही. त्यांच्या मनात राग आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी उमेदवारी करणार. माझे शरद पवार , फडणवीस , नाना पटोले यांच्याशी संबंध ठेवणार आहे. दोन नेते स्वार्थासाठी एकत्र आले. जनतेच्या सेवेसाठी नाही. काही लोक राजकीय स्वार्थासाठी आपले रंग बदलतात त्यांना जनता त्यांची जागा दाखवेल. जनतेचा कौल मोठ्या प्रमाणात माझ्याकडे आहे. गेल्यावेळी जातीचे राजकारण करण्यात आले. अपक्ष उमेदवार करणार  तिकडे गेलेले नगरसेवक नरेंद्र चौधरी , गोपी कासार , सलीम टोपी हे कुठेच जाणार नाहीत ते शेवटपर्यंत माझ्यासोबत असतील याची खात्री आहे.

माझे सर्वांशी संबंध आहेत मी मात्र अपक्ष राहील

 

भाजपच्या बी टीम चे आपण उमेदवार आहेत का ? असे विचारल्यावर त्यांनी माझे सर्वांशी संबंध आहेत मी मात्र अपक्ष राहील. जी सत्ता बसेल तिकडे मी जाईल. पराभव झाल्यापासून मी जनतेच्या विकासाची कामे करतो.

 

मंत्र्यांना अमळनेर तालुका दिसला नाही

 

मारवड गटातील ३२ गावांचे पैसे ,पीक विमा मिळाला नाही. मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीकडे तगादा लावला. मदत व पुनर्वसन मंत्री असून त्यांना सही करताना आपला अमळनेर तालुका दिसला नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button