आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी अमळनेर येथे प्रांत कार्यालयाच्या गेटवर बसून एकाचे आंदोलन

अमळनेर (प्रतिनिधी) आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी अमळनेर येथे प्रांत कार्यालयाच्या गेटवर बसून उर्वेश साळुंखे याने लक्षवेधी आंदोलन केले.अमळनेर येथे आदिवासी कोळी समाजाच्या नागरिकांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळावेत यासाठी दि. १५ पासून  बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. परंतु ८ दिवस झाले असुन प्रशासन व शासन लक्ष देत नाही आहे.

 या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी बुधगाव (ता. चोपडा) येथील युवक उर्वेश साळुंखे यांनी अमळनेर येथील प्रांत कार्यालयाचे गेटवर बसून लक्षवेधी आंदोलन केले. या प्रसंगी जगन्नाथ बाविस्कर, मधुकर गरु सोनवणे, प्रवर्तनचे मदन शिरसाठे , हिलाल सैदाणे, रामचंद्र सपकाळे, शांताराम कोळी, रावसाहेब शिरसाठ, भुषण कळी, भिमराव कोळी, उखा कोळी, गजानन कोळी, सागर कोळी, सुनील कोळी, वसंत महाराज, साहेबराव कोळी, सुखदेव सोनवणे, अशोक कोळी , सुभाष रामसिंग,यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *