खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

दोन वर्षापासून कोरड्या पडलेल्या ७०० फूट खोल बोअरवेल मधून वाहतेय गरम पाणी

आनोरे शिवारातील प्रकार

 

अमळनेर (प्रतिनिधी) दोन वर्षापासून कोरड्या पडलेल्या ७०० फूट खोल बोअरवेल मधून अचानक  गरम पाणी जमिनीपर्यंत वर येऊन वाहू लागल्याची घटना तालुक्यातील आनोरे येथे घडली. आनोरे परिसरातील शेतकरी आनंदाने हा निसर्गाचा चमत्कार बघायला गर्दी करत आहेत

  याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील आनोरे येथे मिठाराम कांशीराम पाटील यांच्या आनोरे शिवारातील गट नंबर १४७ मधील शेतात काही वर्षांपूर्वी ७०० फूट बोअरवेल केला होता. दोन वर्षापासून हा बोअर कोरडा झाला होता. मात्र अचानक दोन दिवसांपासून बोअर मधून गरम पाणी बिना मोटारीचे जमिनीवर येऊन वाहत आहे. हे वाहून जाणारे पाणी ज्या नाल्यात सोडले आहे  त्या नाल्याचे पाणीदेखील गरम झाले आहे. आनोरे परिसरातील शेतकरी आनंदाने हा निसर्गाचा चमत्कार बघायला गर्दी करत आहेत. आनोरे येथे निसर्गाची अद्भुत कृपा श्रीमत मिठाराम काशीराम पाटील ग. न. 147 आनोरे शिवार यांच्या शेतातील कोरडा असलेला बोरवेल ओव्हर फ्लो होऊन वाहत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button