विशालगड येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ एआयएमआयएमतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

अमळनेर (प्रतिनिधी) विशालगड येथील घडलेल्या घटनांच्या निषेधार्थ  शहरातील एआयएमआयएमतर्फे उप विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी खासदार सैय्यद इम्तियाज़ जलील व जळगांव जिल्हाध्यक्ष अहमद हुसैन सर यांच्या आदेशानुसार अमळनेर  एआयएमआयएमच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड मध्य गज़ापूर गावात अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली हिंसाचार करण्यात आला. त्यात विशाळगड दर्गा आणि मशिदीची तोडफोड करण्यात आली आणि स्थानिक मुस्लिमांवर हल्ले करून त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करण्यात आले. विशालगड हिंसाचाराच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात यावे आणि हिंसाचारात सामील असलेल्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी सदरील विषयांवर तात्काळ निर्णय घेऊन वरील विषय प्रमाणे आमची मागणी मंजूर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या वेळी एआयएमआयएमचे अमळनेर शहराध्यक्ष हाजी सईद,अल्तमश शेख, आकीब सैय्यद, अख्तर सैय्यद,गुलाम पिंजारी, शाहिद शेख,दानिश शेख,अल्ताफ राजा , सलमान भाई, मोहसीन भाई  बुटी,अल्ताफ शाह , अमन बागवान, शारुख बागवान, बिलाल सैय्यद, इम्मु पहलवान,मोहम्मद जाविद  सह आदि उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *