जुने मधुमेह रुग्णांसाठी 21 जुलै रोजी शुगर आणि नेत्र रोग चिकीत्सा शिबिराचे आयोजन

श्री गणेश आय हॉस्पिटल, लायन्स क्लबसह लिनेस क्लब ऑफच्या संयुक्त विद्यमाने  आयोजन

 

अमळनेर (प्रतिनिधी ) शहरातील श्री गणेश आय हॉस्पिटल, लायन्स क्लब आणि लिनेस क्लब ऑफ यांच्या संयुक्त विद्यमाने जुने मधुमेह रुग्णांसाठी रविवार 21 जुलै रोजी शुगर आणि नेत्र रोग चिकीत्सा शिबिराचे आयोजन  करण्यात आले आहे.

यात मधुमेह रुग्णांची मोफत शुगर आणि नेत्रपटल (रेटिना) तपासणी केली जाणार आहे तरी  गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गणेश आय हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी रुग्णांनी श्री गणेश हॉस्पिटल, डॉ. अविनाश जोशी, जोशी हॉस्पिटल, डॉ. दिनेश महाजन, मोरया हॉस्पिटल, मानसी मेडिकल, आणि विजय मेडिकल, येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *