खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी मैराळे तर खान्देश विभागीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. विजय गाढे

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत अमळनेर तालुका अध्यक्षदी समाधान एकनाथ मैराळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे.

मैराळे यांची  नियुक्ती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य महासचिव डॉ. विश्वासराव आरोटे, राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने करण्यात आली. नियुक्तीपत्र प्रदान समारंभात खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, खान्देश विभागीय कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, खान्देश विभागीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. विजय गाढे यांच्या हस्ते समाधान मैराळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. दरम्यान निवड झाल्यानंतर तालुकाध्यक्ष समाधान मैराळे यांनी तालुका कार्यकारणी जाहीर केली असून सचिवपदी सुरेश कांबळे, कार्याध्यक्षपदी दिनेश पालवे, उपाध्यक्षपदी प्रवीण बैसाणे, नूर खान पठाण, खजिनदार हितेंद्र बडगुजर, संघटक आत्माराम अहिरे, प्रसिद्धीप्रमुख योगेश पाने, कार्यकारिणी सदस्य काशिनाथ चौधरी, सत्तार खान, यदुविर पाटील, सोपान भवरे यांची निवड करण्यात आली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button