एकलहरे गावाजवळील अरुंद पुल वाहनधारकांसाठी ठरतोय जीवघेणा

संरक्षण कठडे नसल्याने अपघातांमध्ये झाली वाढ

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील गलवाडे ते बेटावद रस्त्यावरील एकलहरे गावाजवळील लौकी नाल्यावरील पुलाला संरक्षण कठडे नसल्याने लहान, मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या पुलावर संरक्षण  कठडे  उभारण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत हायब्रीड ॲन्यूइटी मॉडेल योजनेअंतर्गत झालेला असून दहा वर्षापर्यंत या रस्त्याची देखभाल दुरुस्ती ठेकेदाराकडे असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता हे ठेकेदाराकडून या पुलाला संरक्षण कठडे बसविण्यासाठी व इतर उपाययोजना करण्यासाठी पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत. तसेच या पुलाला दोन्ही बाजूने मोठे वळण असून पुलाच्या दोन्ही बाजूने पुढे अरुंद पुल आहे, असा सूचनाफलक देखील नसल्याकारणाने नरडाणा औद्योगिक वसाहतीत दळणवळणासाठी वेगाने ये-जा करणारे  लांब व मोठ्या अवजड वाहनधारकाना समोर अचानक विना संरक्षण कठडे असलेला अरुंद पुल नजरेस पडतो. तेव्हा त्यांची तारांबळ उडते. व अचानक आपल्या अवजड वाहनाचा वेग नियंत्रण आणावा लागतो. अन्यथा अपघात होण्याची दाट शक्यता असते.  तसेच पुलाच्या दोन्ही बाजूने असलेल्या वळणांवर मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या काटेरी  झाडे- झुडपामुळे  समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने वाहनधारकांना  आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ करण्याची मागणी एकलहरे येथील ग्रामस्थांसह परिसरातील वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

 

पुलाला संरक्षण कठडे उभारावे

 

गावाजवळील नाल्यावरील पुलाला संरक्षण कठडे उभारण्याची गरज असून तसेच या अरुंद पुलावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक चालू असते. वाहनधारकांसाठी अरुंद पुलाबाबत दोन्ही बाजूला सूचना फलक संबंधित विभागाने त्वरित लावावेत. व पुलाच्या दोन्ही बाजूने असलेल्या वळणांवर मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या काटेरी झाडे-झुडपांची कटाई करावी.

विद्याबाई सुरेश पाटील, सरपंच, एकलहरे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *