अमळनेर (प्रतिनिधी) येथील तिरंगा चौकापासून प्रांत कार्यालयावर १५ जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या बिऱ्हाड मोर्चास व बेमुदत ठिय्या आंदोलनास धाडस संघटनेने पाठींबा जाहीर केला आहे.
आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळीचे जातप्रमाणपत्र मिळाले पाहिजेत, यासाठी अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) व अमळनेर कोळी मंडळाचे अध्यक्ष मधुकर गुरु सोनवणे यांच्या नेतृत्वात १५ जुलै रोजी स. ११ वा. अमळनेर येथील तिरंगा चौकापासून प्रांत कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या भव्य बिऱ्हाड मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. यास धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी, उत्तर महाराष्ट्र प्रमुख शरद तायडे, जिल्हाध्यक्ष प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी पाठींबा जाहीर केला आहे. याप्रसंगी धाडस संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा.भाऊसाहेब सोनवणे, युवाध्यक्ष चंदन कोळी, कार्याध्यक्ष प्रमोद घुगे, जिल्हासचिव चंद्रशेखर कोळी, मानसिंग सोनवणे, किरण भावसार, तालुकाध्यक्ष रामकृष्ण कोळी, उपतालुकाध्यक्ष एकनाथ सैंदाणे (जळगाव), मोहन सपकाळे, गजानन कोळी (यावल), किरण कोळी (धरणगाव), सोपान देवराज (चोपडा), दिपक सोनवणे (भुसावळ), एडव्होकेट विनोद सोनवणे (जामनेर), किशोर कोळी (पाचोरा), विनोद कोळी (रावेर) यांचेसह धाडस संघटनेचे शेकडों कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.