मुडी प्र.डा. बोदर्डे शाळेत मुलांना वह्या, मुव्हेबल प्रोजेक्टर, स्पीकर भेट

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मुडी प्र.डा. बोदर्डे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दोन दात्यांनी मुलांनी वह्या आणि डिजिटल शिक्षणासाठी मुव्हेबल प्रोजेक्टर विथ स्पीकर भेट देण्यात आले.

मुडी प्रं.डा. गावचे दानशूर व्यक्ती कमलेश अशोक सूर्यवंशी यांच्याकडून आई वडिलांच्या स्मरणार्थ इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या १६६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोनशे पेजेस सहा वह्या त्यांचे मोठे बंधू पंकज अशोक पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वाल्मीक सुरेश पवार यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दुसरे दानशूर व्यक्ती प्रमोद मधुकर पाटील ( झेड. डी. सोनवणे माध्यमिक विद्यालय, मूडी) यांच्याकडून आईच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे म्हणून मुव्हेबल प्रोजेक्टर विथ स्पीकर देण्यात आले. ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर नेऊन ऑनलाइन शिक्षण घेता येऊ शकेल. त्याबद्दल त्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तुषार उत्तमराव सैंदाणे यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार महेंद्र पाटील, मुडी ग्रामपंचायत सदस्य विलास सूर्यवंशी, मा.जी. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश शिंदे, प्रदीप पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सतीश हिरालाल शिंपी यांनी केले. मुख्याध्यापक गोकुळ पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *