अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जवखेडा येथील शेतकऱ्याने मांडळ रस्त्यावरील महादेव मंदिरा मधील लोखंडी अँगलला सुती दोरीच्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १० रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जवखेडा येथील रवींद्र यशवंत पाटील (वय ४९) यांनी मांडळ रस्त्यावरील महादेव मंदिरा मधील लोखंडी अँगलला सुती दोरीच्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत त्यांचा मुलगा गोपी याने त्याचे काका गोकुळ धोंडू पाटील यांना कळवले असता ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेथे गावाचे पोलीस पाटील प्रकाश सुकदेव कुऱ्हाडे, सुभाष नथ्थू पाटील, बापू धनगर पाटील, मनोहर लोटन पाटील, प्रविण यंशवत पाटील यांच्या मदतीने त्यांना खाली उतरवले. गावातील मनोहर पाटील यांच्या खाजगी गाडीतून अमळनेर ग्रामिण रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी गोकुळ धोंडू पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सफौ संजय पाटील करीत आहेत.