खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर पोलीस स्टेशनचा फोन बंद, नागरिकांची होतेय गैरसोय

अमळनेर (प्रतिनिधी) तांत्रिक कारणाने अमळनेर पोलीस स्टेशनचा लँडलाईन नंबर गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. दुरुस्तीसाठी बीएसएनएल विभाग दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांना पोलिसांशी संपर्क करण्यास खूप अडचणी येत आहेत.

 अमळनेर पोलीस स्टेशन शहराबाहेर चार ते पाच किमी अंतरावर आहे. त्यामुळे पोलिस स्टेशनचा लँड लाईन फोन हाच पोलिसांशी संपर्क साधण्याचा सुकर मार्ग आहे. तातडीची घटना घडल्यास लँड लाईनवर कळवण्यात येते. मात्र गेल्या कित्येक दिवसापासून हा फोन बंद झाल्याने नागरिकांचा पोलिसांशी संपर्क होत नाही. पोलिसांनी अनेकवेळा बीएसएनएल कडे तक्रारी करूनही काहीच उपयोग झाला नाही. बीएसएनएलकडे कर्मचारी व यंत्रसामुग्री अपूर्ण पडत असल्याने फोन दुरुस्त होत नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button