


अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे सुरू असलेल्या कै. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मेडियम स्कुल चे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पोलिस निरीक्षक श्री.अनिल बडगुजर यांनी भुषविले. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. तिलोत्तमा पाटील हुसैन साठे व रंजना देशमुख तसेच मंगला ब्राम्हणकर, कल्पना पवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन दिपप्रज्वलनाने झाले. यात नर्सरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य सादर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.श्वेता दिक्षित व शिक्षिका पुनम राजपूत यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिमा बडगुजर, सुरेखा हडपे, सुषमा वाघ, भाग्यश्री माळी, वैशाली पाटील, सुलभा पाटील, भावना पाटील, गितांजली पाटील, योगिता फाळके, यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन भावना पाटील यांनी केले. त्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री.उत्कर्ष पवार व सचिव सौ. अलका पवार यांचे मार्गदर्शन लाभले..