
अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेर येथील एका खाजगी मालमत्तेचा कर कमी करून देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या नगरपरिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग केल्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
दि १९ जानेवारी रोजी १२००० हजारची लाच घेताना दोन्ही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती, त्या अनुषंगाने अमळनेर नगरपरिषदेचे शोभा बाविस्कर यांनी कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्या प्रकरणी महा,नागरी सेवा सर्वसाधारण शर्ती नियम (शिस्त अपील)नियम १९७९ चे कलम १८ खालील तरतुदी नुसार नगरपरिषदा अधिनियम १९६५ चे कलम ७८ (२) मधील तरतुदी प्रमाणे दोन्ही कर्मचाऱ्यांना दि १९ जानेवारी पासून नगरपरिषद सेवेतून निलंबित करण्याचा आदेश मुख्यधिकारी यांनी दिले आहे. निलंबित कालावधीत वरिष्ठांच्या पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडुन जाऊ नये तसेच सेवा पुस्तकात नोंद घ्यावी असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.