खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

श्री अंबरीश ऋषी महाराज टेकडीवरील 2,222 वृक्षारोपणामुळे राज्यभर नावलौकिक होणार

अभियानाला यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा :  संदीपकुमार साळुंखे

 

बन्सीलाल पॅलेस मध्ये झाली नियोजन बैठक

 

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबरीश ऋषी महाराज टेकडीवर 2 मिनिटात 2,222 वृक्षारोपणामुळे राज्यभर अमळनेरचे नावलौकिक होणार असून या अभियानाला यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन अमळनेर तालुक्याचे सुपुत्र तथा आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांनी बैठकीत केले.

या अभियानाचे नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन बन्सीलाल पॅलेस मध्ये करण्यात आले होते. यावेळी मंचावर संदीपकुमार साळुंखे, बजरंगलाल अग्रवाल, माजी प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी व मोतीलाल जैन उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना साळुंखे म्हणालेत की लहान असताना यात्रेच्या दिवशीच अंबरीश  टेकडीवर जायचो,तेव्हा टेकडीचा इतिहास माहीत नव्हता,त्याठिकाणी पाणी पुरवठा केंद्र असले तरी हजारो लिटर पाणी वाया जात होतं,ही टेकडी म्हणजे 34 एकराचे पठार आहे,वाया जाणारे पाणी जिरवल तर अशी कल्पना आम्हाला सुचली, सर्वानी हातभार लावला,टेकडी ग्रुपच्या मावळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि आज टेकडीवर साकारलेल चित्र तुम्ही पाहत आहे,आज पाच तलाव तेथे साकारले आहेत,टेकडीवर काम करताना कुणी मालक नव्हते, बॉस नव्हता, सर्वच बॉस होते. दक्षिण आफ्रिकेत केप टाऊन आणि भारतात बेंगलोर कोरडे झाल्याचे आम्ही पाहिले,पुढंच्या दहा वर्षात फक्त पाण्यामुळे भारताचा विकास स्लो होईल असे संकेत आहेत.त्यामुळेच असे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्याची गरज असून टेकडीवरील या अभियानात सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी, बजरंग अग्रवाल, मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी विविध मुद्दे मांडत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आशिष चौधरी यांनी केले. यावेळी डॉ. अनिल वाणी, माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी, संजय चौधरी, जळगाव जनता बँकेचे शाखाधिकारी महेश गर्गे, प्रा दिलीप भावसार, जयदीप राजपूत, प्रताप साळी,प्रतीक जैन,योगेश वाणी, दिनेश रेजा, दिनेश कोठारी, बाविस्कर, महेश कोठावदे, डॉ. अनिल वाणी,नरेंद्र चौधरी, संजय चौधरी,महेश गर्गे,दिलीप भावसार, जयदीप राजपूत,प्रताप साळी,प्रतीक जैन,योगेश वाणी,दिनेश रेजा,कोठारी,बाविस्कर,गिरीश कोठारी,डी ए धनगर, नरेश कांबळे, चेतन राजपुत, उमेश काटे,हेमंत पाठक, प्रताप साळी,गिरीश कुलकर्णी, बाविस्कर सर यासह मंगळग्रह सेवा संस्था,रोटरी क्लब,छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप, महिला हाऊसिंग ट्रस्ट आदींचे व टेकडी ग्रुप सदस्य उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button