खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

५० हजारांची रक्कम आणि ६ ग्रॅम सोन्याचे सापडलेले टोंगल प्रामाणिकपणाने केले परत

अमळनेरमध्ये भास्कर पारधी यांनी इमानदारीचे होतेय कौतुक

 

अमळनेर (प्रतिनिधी) सप्तशृंगीदेवीच्या साक्षीने ५० हजारांची रक्कम आणि ६ ग्रॅम सोन्याचे टोंगल असलेला डबा मिळाल्यानंतर तो परत  करीत प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले.

याबाबत अधिक माहिती अशी की अमळनेर तालुक्याजवळ असलेले गांधली पिळोदा रस्ता लगत असलेल्या सप्तशृंगी मंदिरजवळ भास्कर पारधी नावाच्या या व्यक्तीला मंगळवारी दुपारी हे मौल्यवान सामान मिळाल होते. ते डबा उघडून पाहिल्यावर त्यात ६ ग्रॅम सोन्याचे टोंगल आणि ३ भार चांदी असल्याचे दिसून आले. तपास केल्यानंतर हे सोने आणि चांदी नंदगाव येथील भारती प्रवीण पाटील यांचे असल्याचे निश्चित झाले. त्यानंतर भास्कर पारधी यांनी भारती पाटील यांना संपर्क साधून त्यांना हे सामान परत केले. भारती पाटील यांनी भास्कर पारधी यांच्या इमानदारीची प्रशंसा केली आणि त्यांचा सत्कार केला.भास्कर पारधी हे पत्रकार गणेश चव्हाण यांचे मावस भाऊ आहेत. भास्कर पारधी यांनी दाखवलेली इमानदारी निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कृतीमुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे. त्यामुळे त्यांचे इमानदारीचे कौतुक होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button