म.सा.प.अमळनेर, पुज्य सानेगुरूजी वाचनालय,मराठी वाड:मय मंडळाच्या वतीने कवी रमेश पवार यांचा सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी)-समाजात जे वाईट चालते त्यांच्या विरोधात लिहण्याची धमक ज्यात असते तोच कवी असतो.सध्या देशात कवींची संख्या वाढली असली तरी महीला नाचवण्यापेक्षा कवी असणे बरे आहे. कवीतेचा आधार घेतल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आतापर्यंत अनेक कवींनी आईवरच कवीता यासाठी लिहील्या कि जबाबदारीतून आपली सुटका व्हावी म्हणूनच पण याला कवी रमेश पवार अपवाद आहेत ज्यांनी बाप कवीता लिहून जी महाराष्ट्रभर गाजली.म्हणून बापाला सुध्दा डोळे पुसायला पदर हवा होता.अमळनेर येथे कवीचा सत्कार करण्यासाठी भाग्य लाभले.कवीने किती कवीता लिहील्या याच्यावर त्याचे मोठेपण ठरत नाही. बहीणाबाई चौधरीच्या फक्त बावन्न कवीता लिहल्या ,पण त्या जगभर गाजल्या.कवी रमेश पवारांच्या बाप कवीता राज्यभर गाजली.ही त्याच्यातील कवीत्वपणाची भावना अभिनंदनीय आहे.महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या वतीने सदस्य पदी निवड होऊन एवढामोठा सत्कार समारंभ होतो हे कौतुकास्पद आहे. असे अमळनेर येथे मराठीतील प्रसिद्ध कवी तथा म. सा.प.चे कार्याध्यक्ष कवी रमेश पवार यांची महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याने त्यांच्या सत्कार प्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी शंभू अण्णा पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे येथील विभागीय कार्यवाह प्राचार्य तानसेन जगताप होते तर प्रमुख पाहुणे मसापचे अध्यक्ष नरेंद्र् निकुंभ , मराठी वाड़मय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी पूज्य साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे व सत्कार मूर्ती रमेश पवार ,सौ.प्रमिला पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अविनाश जोशी यांनी केले सत्कार प्रसंगी मनोगत दिलीप सोनवणे ,नरेंद्र निकुंभ धनंजय सोनार ,कृष्णा पाटील ,प्रा. माधुरी भांडारकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमन वसुंधरा लांडगे यांनी सन्मानपत्राचे वाचन केले.
अध्यक्षीय भाषणातून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय कार्यवाह प्राचार्य तानसेन जगताप म्हणाले की जेथे वेदना आहेत तेथूनच काव्याची निर्मिती होते आज अंमळनेर तालुक्यात संस्कृती साहित्य शिक्षण जिवंत आहे. पूज्य साने गुरुजींचा वारसा आजही जिवंत पाहायला मिळतो याचा आनंद वाटतो जसा विचार हा क्रांती दर्शक असतो तसा कवी हा आपल्या कवी तून समाजाचं दुःख मांडण्याचं काम करतो कवी हा जन्माला येत नाही त्यासाठी मन लागते भावना लागतात विचार लागतात तेव्हा कवी तयार होतो अशाच प्रकारचा कवी एका ग्रामीण भागातून रमेश पवार सारखा तयार झाला आणि त्याच्या कविता महाराष्ट्रात गाजल्या त्याच्या कार्याची पावती म्हणून शासनाने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड केली आणि त्याच्या सत्कारासाठी एवढ्यात तोलामोलाची माणसे याठिकाणी उपस्थित राहिली हीच कामाची पावती आहे असे अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य जगताप यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ रमेश माने यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा अमळनेर मराठी वाड:मय मंडळ अमळनेर, पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर यांच्यावतीने कवी रमेश पवार यांची महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना कवी रमेश पवार म्हणाले की एवढा मोठा माझा सत्कार माझ्यावर प्रेम केलेल्या ज्येष्ठांनी केला मला निश्चितच भविष्यामध्ये प्रेरणा मिळेल मी अधिक जोमाने काम करेल मी सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो असे सांगितले .
या कार्यक्रमासाठी अहिराणी साहित्यीक कृष्णा पाटील गं.का. सोनवणे गोकुळ बागुल. शरद सोनवणे,सिनेट सदस्य दिनेश नाईक, संदीप घोरपडे , न.पा.शिक्षण मंडळ सभापती नितीन निळे,प्रा. माधुरी भांडारकर,आत्माराम चौधरी, विकासराव जोशी, चंद्रशेखर भावसार, भैय्यासाहेब मगर, भीमराव जाधव,चंद्रकांत नगांवकर ,निलेश पाटील ,ईश्वर महाजन,सुमीत धाडकर सौ माधुरी पाटील, अँड तिलोत्तमा पाटील,विजया गायकवाड,हिरामण कंखरे, प्रा अशोक पवार व
अमळनेर तालुका धनगर समाजाचे हिरामण कंखरे, विजय धनगर, दशरथ लांडगे, डी. ए. धनगर, निरंजन पेंढारे, गोपाल हडपे, हरचंद लांडगे, बन्सीलाल भागवत, आत्माराम कंखरे, सुधाकर पवार, युवराज पवार,पोस्ट विभागाचे कर्मचारी वर्ग,साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील रसिक मान्यवर उपस्थित होते.