अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुका विधानसभा निवडणूक काँग्रेस लढणार असल्याने इच्छुकांची चाचपणी आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीची शुक्रवारी सभा झाली.
धनदाई माता एज्युकेशन सोसायटीच्या हॉलमध्ये दुपारी झालेल्या सभेत निरीक्षक म्हणून प्रदीप देशमुख व देवेंद्र सिंग पाटील (चाळीसगाव) यांची पक्षाकडून निरीक्षक म्हणून खास उपस्थिती होती. दोन्ही पाहुण्यांचे स्वागत, सत्कारनंतर, शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी, अमळनेर विधानसभेच्या काँग्रेस उमेदवारांचा वीस वर्षाचा इतिहास, कथन करताना अमळनेरची जुनी काँग्रेसपासून तर कै. अमृत आप्पां पर्यंतचा सर्व इतिहास वाचला. त्यानंतर” सभेत भाषणे नकोत” म्हणून सर्व उपस्थितांतर्फे माजी जि. प. सदस्य शांताराम शामराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात शांताराम पाटील यांनी अमळनेर मतदार संघ काँग्रेसला सोडावा? यासाठी सर्व उपस्थितांची मते घेतली. त्यात सर्वत्र, एक मुखाने अंमळनेर विधानसभा काँग्रेसला सोडण्याचे सूतोवाच आक्रमक पद्धतीने केले. त्यानंतर निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी काँग्रेसची आजची परिस्थिती व भाजपने केलेले महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, पक्षफोडी, तसेच जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती अवगत केली. अमळनेरची विधानसभेची जागा काँग्रेस पक्षालाच सोडली जाईल, असे अशवस्थ केले. उपस्थितना मार्गदर्शन केले. त्यानंतर निरीक्षकांनी स्पष्ट केले की “बंद खोलीत फक्त इच्छुक उमेदवार व दोन्ही निरीक्षक यांची बोलणी होतील” व आम्ही अमळनेर तालुक्यातील इच्छुकांची नावे व त्यांचे मनोगत जिल्हा काँग्रेस, प्रदेश काँग्रेसला कळवू. त्यानंतर डॉ अनिल शिंदे, सुलोचना वाघ, संदीप घोरपडे, के. डी. पाटील,सईद तेली, यांची निरीक्षकांसोबत बोलणी झाली. प्रत्येकाने आपापले बायोडेटा, फाईल निरीक्षकांना सुपूर्त केल्या. अगदी उल्हासित व आनंदी वातावरणात सभा झाली. सभेस तालुका अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, ओबीसी जिल्हाध्यक्ष डी. डी. पाटील, उपाध्यक्ष गोकुळ पाटील युवक अध्यक्ष एडवोकेट कौस्तुभ पाटील, महिला शहराध्यक्ष प्रा. नयना पाटील, संभाजी पाटील, सुरेश पाटील, राजू पापरीकर, आधार बाबुराव पाटील, प्रताप नगराज पाटील, रोहिदास सुखा पाटील, राजेंद्र साहेबराव पाटील, गजेंद्र साळुंखे, प्रेमराज वामन चव्हाण, अमित पवार, प्रकाश सुखदेव पाटील, होलार, कन्हैयालाल कापडे, पार्थ राज पाटील, रामकृष्ण पाटील, प्रवीण जैन, अली मुजावर, शेखा मिस्तरी, त्र्यंबक पाटील, डॉक्टर रवींद्र पाटील, भास्कर बोरसे, भगवान संधान शिव, भानुदास कांबळे, राजू भट, के.वी पाटील, बन्सीलाल भागवत अजहर आली हर्षल जाधव, शरद पाटील, अशोक दाजभाऊ, विठ्ठल पवार, श्रीराम पाटील, श्रीराम एकनाथ पाटील, नरेश राठोड, पी. वाय. पाटील, सहित तेली, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह 250 जणांची उपस्थिती होती. शेवटी सर्व कार्यकर्त्यांचे आभार तालुकाध्यक्ष बी.के. सूर्यवंशी यांनी मानले.
हे आहेत इच्छुक उमेदवार
इच्छुक उमेदवार म्हणून जेष्ठ नेत्या डॉ अनिल शिंदे, सुलोचना वाघ, संदीप घोरपडे, के. डी. पाटील,सईद तेली यांची निरीक्षकांसोबत चर्चा झाली. प्रत्येकाने आपापले बायोडेटा, फाईल निरीक्षकांना सुपूर्त केल्या. अगदी उल्हासित व आनंदी वातावरणात सभा संपन्न झाली.