अमळनेर (प्रतिनिधी) औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पी. सी. भांडारकर व स्व. प्रा. र. का. केले फार्मसी महाविद्यालयाच्या पदविका फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला.
म. रा. तंत्र शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या औषध निर्माणशास्र पदविका परीक्षेचा महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाचा निकाल १०० टक्के व द्वितीय वर्षाचा निकाल ९० टक्के लागला. प्रथम वर्षातील विद्यार्थीनी प्राची चौधरी ७९टक्के, दिपाली सुर्यवंशी ७६ टक्के, माया नेटकर ७५ टक्के गुण प्राप्त करुन त्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे अंतिम वर्षातील विद्यार्थीनी मानसी पाटील ८३टक्के, तेजल जैन ८०टक्के, कु बुशरा खाटीक ७९ टक्के गुण प्राप्त करुन त्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. प्रथम व अंतिम वर्षात देखील मुलींनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए निरज अग्रवाल, फार्मसी विभागाचे अध्यक्ष योगेश मुंदडे, संचालक मंडळातील पदाधिकारी प्रदीप अग्रवाल, हरी भिका वाणी, डॉ. अनिल शिंदे, संस्थेचे सेक्रेटरी व प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, जॉ. सेक्रेटरी प्रा. डॉ. धीरज वैष्णव, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र सोनवणे, परीक्षा केंद्र प्रमुख प्राध्यापिका हर्षदा पवार, विभाग प्रमुख प्रा. रविंद्र माळी यांनी कौतुक केले.