शिरुड येथे दोन ठिकाणी घरफोडी, एक लाखाचा मुद्देमाल चोरून नेला

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरूड येथे घराच्या भिंतीला पडलेल्या भगदाडाला बांधलेला प्लास्टिक कागद फाडून चोरट्यांनी ९९ हजारांचा मुद्देमाल तर दुसऱ्या घरातील पाच हजार रुपये व एक ग्रम सोने चोरून नेल्याची घटना २९ जून रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  पोलिसानी दिेलली माहिती अशी की शिरूड येथील मंगरूळ रस्त्यावर असणाऱ्या सकुंतला दुर्योधन पाटील यांच्या घरात चोरट्यांनी भिंतीला बांधलेल्या प्लास्टिक कागद फाडून २८ रोजी रात्री प्रवेश केला. घरात लोखंडी पेटीत ठेवलेले ७० हजार रुपये रोख, २० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम सोन्याचे पेंडल, ४ हजार रुपये किंमत असलेले १ ग्रॅम सोन्याचे पान, ३ हजार रुपये किमतीचे ४ भार वजनाचे चांदीचे कडे तसेच २ हजार रुपयाचे २ भार वजनाची चांदीची चैन असा ९९ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला. नरेंद्र उत्तम माळी यांच्या घरातून पाच हजार रुपये रोख व १ ग्रॅम सोन्याचे पान असा मुद्देमाल चोरीला गेला आहे. सकुंतला पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *