कुर्हे खु येथे नदी पूर्णजिवन योजनेंतर्गत बंधारे बांधून सिंचनाचा प्रश्न सोडविणार-आ शिरीष चौधरी

कुर्हे खु येथे सामाजिक सभागृहासह शुद्ध पिण्याच्या आर ओ प्लांटचे थाटात लोकार्पण

आमदार निधीतून २० गावांना बसणार आर ओ प्लांट

अमळनेर( प्रतिनिधी)ग्रामिण भाग टंचाईमुक्त करण्याचे आमचे ध्येय असताना कुर्हे खु येथे हिरा उद्योग समूहाच्या स्व निधीतून नाला खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले असून चिखली नदीवर बंधारा बांधण्यात आला आहे,यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न बऱ्यापैकी सुटला आहे,अजून सिंचनाचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नदी पूर्णजीवन योजनेअंतर्गत बंधारे बांधण्यात येणार असल्याची ग्वाही आ शिरीष चौधरी यांनी कुर्हे खु येथे ग्रामस्थांना सामाजिक सभागृह तसेच आर ओ प्लांट लोकार्पण प्रसंगी दिली.
कुर्हे खु येथे आमदार निधीतून सामाजिक सभागृहाचे काम पूर्णत्वास आले तसेच ग्रामस्थांना अतिशय कमी दरात शुद्ध व थंड पाणी मिळावे यासाठी आमदार निधीतूनच आर ओ प्लांट बसविण्यात आला,या दोन्ही विकासकामांचे थाटात लोकार्पण आ चौधरींच्या हस्ते करण्यात आले,यावेळी आमदारांनी आपल्या मनोगतात विकासाचा आढावा मांडून दमदार विकासासाठी तुम्ही देखील दमदार साथ द्या असे भावनिक आवाहन केले,तसेच अनेक आजारांचे मूळ हे पाणी असल्याने ग्रामिण जनतेचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी आमदार निधीमधून 90 लाख रु अंतर्गत 20 आर ओ वॉटर फिल्टर मंजूर झालेले असून मतदार संघातील अमळगाव, पातोंडा, कलाली,आर्डी-अनोरे, सडावन, टाकरखेडा, कुऱ्हे चांदणी, मांडळ, निंब, कळमसरे, जुनोने, नगाव बु, पिपळें चिमनपुरी, दहिवद, सारबेटे,महाळपुर, शेळावे,रत्नापिंप्री, बहादरपूर, वसंतनगर आदी ठिकाणी हे प्लांट बसविले जात आहेत,पुढील टप्प्यात इतर गावांना हे आर ओ प्लांट बसविले जातील अशी माहिती आमदारांनी दिली,आ चौधरींच्या माध्यमातून गावाला हायमास्ट लॅम्प मिळाला असून याव्यतिरिक्त इतर उल्लेखनीय विकासकामे झाल्याने आमदारांचा ग्रामस्थांच्या भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी न प चे गटनेते प्रवीण पाठक, नगरसेवक नरेंद्र चौधरी, सुरेश सोनवणे, किरण गोसावी, मा. उपनगराध्यक्ष आबु महाजन, सुनील भामरे, सुंदरपट्टी सरपंच सुरेश पाटील, नगाव बु. सरपंच महेश पाटील, कुऱ्हे बु.सरपंच प्रवीण पाटील, कुऱ्हे खु सरपंच सुनीता सुनील पाटील, मा सरपंच शोभा रवींद्र पाटील, गोविंदा पाटील,मधुकर धनगर,दीपक पाळधी,मालुबाई धनगर,सीमा राजेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, सुनील पाटील, खेडी सरपंच संजय पाटील, पो. पा नगाव प्रवीण गोसावी, मच्छिद्र ट्रेलर, प्रताप पाळधी, तलाठी प्रशांत पाटील, विकासो चेअरमन विनोद जैन, आनंदसिंग पाटील, रवींद्र पाटील,भागवत चौधरी,ज्ञानेश्वर पाटील, पोलीस पाटील भरत पाटील, रघुनाथ धनगर, अजबसिंग पाटील, सुभाष पाटील,प्रमोद चौधरी, समाधान पाटील, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *