पाणी भरताना पाय घसरल्याने विहिरीत पडून ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील रढावन येथे
मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्याने काल सकाळी ६ वाजेपुर्वी पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेलेली एक ५५ वर्षीय महिला पाय घसरून विहिरीत पडल्याची दुर्दैवी घटना तालुक्यामध्ये घडली आहे.
विठाबाई महाला पाटील वय ५५ रा रढावन ही महिला सकाळी विहिरीवर पाणी भरायला गेली असता तिचा पाय घसरून ती विहिरीत पडली गावकऱ्यांनी तिला बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात हजर केले असता तिचा मृत्यू झालयाचे डॉक्टरांनी घोषित केले पोलीस पाटील यशवंत पुंडलिक पाटील यांनी पोलिसात फिर्याद दाखल केल्यावरून अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल दीपक विसावे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *