अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथे महिला रणजी संघाच्या शिरपुरच्या खेळाडू चेतस्विनी राजपुत यांनी नाणेफेक करून सामन्याची सुरुवात केली.खा.शि.मंडळ संघाने प्रथम फलंदाजी करतांना ८ षटकात ५३ करून मुडी संघाला ५४ धावांचे आव्हान दिले मुडी संघाने फलंदाजी करतांना ३५ धावा केल्याने खा.शि.मंडळ संघाचा १८ धावांनी विजय प्राप्त केला.
यावेळी सामनावीर म्हणुन दिपक सुरळकर उत्कृष्ठ फलंदाज उमाकांत हिरे तर उत्कृष्ठ गोलंदाज गोरख चौधरी तर मालिकावीर भुषण पाटील मुडी यांना देऊन गौरविण्यात आले
यावेळी प्रमुख अतिथी हिरा उद्योग समुहाचे चेअरमन रविंद्र बापु चौधरी गट शिक्षणाधिकारी आर.डी.महाजन सर मारवडचे लोकनियुक्त सरपंच उमेश साळुंखे अमळनेर नगरपरिषद शिक्षण सभापती रत्नमाला साखरलाल महाजन सामाजिक कार्यकर्ता सुनील भामरे,साखरलाल महाजन सर,गं.स. हायस्कुलचे मुख्याध्यापक के.डी.सोनवणे द्रौ.रा.कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका जे.के.सोनवणे हे सर्व मान्यवर सामना पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित होते. क्रीडा संयोजक एस.पी.वाघ या सामन्याचे पंच म्हणुन मनजीत सोनार व जिगर यांनी काम पाहिले.