अमळनेर (प्रतिनिधी) हस्ती कॉ.बँकेच्या अमळनेर शाखेच्या सल्लागार समितीवर पंकज वाणी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले जात आहे.
अमळनेर येथील हस्ती कॉ.बँकेच्या शाखेच्या सल्लागार समितीवर सण २०२४-२५ वर्षांसाठी पंकज वाणी यांची नेमणूक करण्यात आली आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सल्लागार समितीवर नियुक्ती असेल असे बँकेच्यावतीने कळविण्यात आले आहे. पंकज वाणी सामाजिक कार्यामुळे सर्वाना परिचित आहेत. त्यांच्या निवडीने सर्वत्र स्वागत होत आहे.