अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर नगरपरिषदेच्या हद्दीतील
दुकानाचा आलेला टॅक्स कमी करून देण्याच्या मोबदल्यात १२ हजारांची लाच घेतल्या प्रकरणी जळगाव लाचलुचपत विभागाने दि १९ रोजी पकडलेल्या न प च्या दोन्ही कर्मचाऱ्यांना जळगाव येथे अमळनेरचे जिल्हा अति व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २२ पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.असून दोन्ही आरोपींना जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रवानगी केली आहे.
सदर प्रकरणी लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभाग जळगाव यांच्याकडे तक्रार दिल्याने पोलीस उपाधिक्षक जी एम ठाकूर यांनी सापळा रचून न प चे वरिष्ठ लिपिक सोमचंद छगन संदानशिव व शिपाई मनोज साहेबराव निकुंभ यांना अटक करून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल केला होता, रविवारी न्यायालयाने दोघांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.