खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

काँग्रेसच्या जिल्हा चिटणीसपदी गजेंद्र साळुंखे यांची केली नियुक्ती

अमळनेर (प्रतिनिधी)   जळगाव जिल्हा काँग्रेसच्या चिटणीसपदी  तालुक्यातील गांधली येथील काँग्रेसचे पदाधिकारी गजेंद्र साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे.

साळुंखे हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून अनेक वर्षापासून पक्षाची ध्येय धोरणे सामान्य जनतेपर्यंत नेण्याच काम करत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल माजी जि.प.सदस्य शांताराम पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डी. डी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ बोरसे, तालुकाध्यक्ष बी.के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष मनोज पाटील, माजी जि.प.सदस्य के.डी. पाटील, सईद तेली, संदीप घोरपडे यांनी कौतुक केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button