खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

ज्वारीच्या शासकीय खरेदीला अखेर गवसाला मुहूर्त

अमळनेर (प्रतिनिधी) ज्वारीच्या शासकीय खरेदीला अखेर मुहूर्त सापडला असून २६०० क्टिंटल असे अतिशय कमी उद्दिष्ट दिल्याने शेतकी संघाच्या गोदामातच ज्वारी खरेदी सुरू झाली आहे.

मार्केटिंग फेडरेशनचे गोदाम बाजार समितीच्या आवारात उपलब्ध होते. मात्र त्यांची १५ लाख थकबाकी असल्याने मार्केटिंग अधिकारी  गोदाम देऊ शकत नव्हते. त्यामुळे ज्वारी खरेदीचे आदेश आल्यानंतरही गोदाम उपलब्ध होत नसल्याने खरेदी होत नव्हती. अखेरीस तब्बल १३ दिवसांनंतर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी फक्त २६०० क्विंटल उद्दिष्ट असल्याने खरेदी केलेली ज्वारी शेतकी संघाच्या गोदामात ठेवण्याची परवानगी दिली आहे. पुरवठा निरीक्षक संतोष बावणे यांच्या हस्ते  काटा पूजन व धान्य पूजन करून खरेदीचा शुभारंभ झाला. प्रथम शेतकरी काशिनाथ रामदास पाटील रा जानवे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी गोदाम व्यवस्थापक संगीता घोंगडे , शेतकी संघाचे व्यवस्थापक संजय पाटील, तहसील कर्मचारी भिकन गायकवाड, सचिन निकम, अरुण पाटील, शिवाजी मोरे, भिकन पवार, मापाडी गणेश बारी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button